Thursday, September 04, 2025 11:48:58 PM

प्रधानमंत्री आवास योजनेचे 20 लाख घरकुल मंजूर

अमित शाह यांचा महत्त्वाचा निर्वाळा : सहकार क्षेत्राच्या विकासाशिवाय भारताची प्रगती अशक्य!

प्रधानमंत्री आवास योजनेचे 20 लाख घरकुल मंजूर

पुण्यात जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवात केंद्रीय गृहमंत्र्यांचे महत्वपूर्ण भाषण!
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर दोन संकल्प ठेवले आहेत. यामध्ये 2047 पर्यंत या देशाला पूर्ण विकसित राष्ट्र बनवायचे आहे. तसेच 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची करायची आहे. सहकार क्षेत्राच्या विकासाशिवाय हे दोन्ही संकल्प पूर्ण होणार नाहीत, असे केंद्रीय गृह तसेच सहकारिता मंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. पुण्यातील जनता सहकारी बँक लिमिटेडच्या हीरक महोत्सवाचा समारोप त्यांच्या उपस्थित झाला त्यात त्यांनी हे वक्तव्य केले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह सहकारी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. शाह म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार काम देणे आणि त्याला देशाच्या विकासासोबत जोडणे हे केवळ सहकारी चळवळीतून शक्य आहे. प्रत्येकाला देशाच्या विकासात योगदान द्यायचे आहे. ज्यांच्याकडे विकास कामांसाठी निधी नाही तो त्यांना मिळवायचा असेल एकमात्र उपाय सहकार क्षेत्रच आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. सहकार क्षेत्राचे मजबुतीकरण केल्याशिवाय भारताची अर्थव्यवस्था गतिशील होऊ शकत नाही. त्यामुळे सहकार चळवळीला अधिक बळ देणे अत्यंत गरजेचे आहे. या क्षेत्रात छोटे शेतकरी, व्यावसायिक आणि उद्योजक यांना आर्थिक संधी उपलब्ध करून देता येईल.

प्रधानमंत्री आवास योजनेत 20 लाखांना घरकुल मंजुरीपत्र
ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे पुणे येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 20 लाख जणांना घरकुल मंजुरीपत्राचे वाटप आणि 10 लाख लाभार्थींना प्रथम हप्त्याचे वितरण शाह यांच्या हस्ते झाले. या योजनेमुळे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेमुळे देशातील नागरिकांना सुरक्षित आणि परवडणारी घरे मिळतील. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास' या संकल्पनेला पुढे नेणारी आहे. अमित शाह यांनी यावेळी सांगितले की, ही योजना गोरगरीबांसाठी नवी संधी घेऊन येणार असून भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर घरकुल मंजुरी दिली जाणार आहे.

रामाचे नाव घेणारे मुख्यमंत्री, गृहमंत्री माणसाच्या हृदयातील राम पाहू शकत नाहीत – वासुदेव मुलाटे


सम्बन्धित सामग्री